Heart attack
भावपूर्ण श्रद्धांजली!💐💐
१
सुनील सुभाष सोनवणे
इयत्ता १ ली ते ४ थी पर्यंत आम्ही एकाच वर्गात होतो. वर्गातील सर्वात हुशार मुलगा. वाघ गुरुजींच्या वर्गातला!
आमची अ तुकडी होती आणि पलीकडची ब.
बालपणीचे सर्वच क्षण हे अविस्मणीय असतात आणि मित्र सुध्दा.
सुनील हा अतिशय चुणचुणीत आणि बुध्दीमान. त्याचे अक्षरदेखील खूपच टपोरे आणि सुंदर. गणितात खूपच हुशार. मला चौथीपर्यंत भागाकार काही जमत नव्हता. त्याने पाटीवर भागाकाराची उदाहरणे सहजतेने शिकवली. शिवाय घड्याळ वाचन देखील. त्याचा एक महत्त्वाचा गुण म्हणजे त्याची कथन शैली. त्याने एखादा चित्रपट बघितला तर तो दुसऱ्या दिवशी आम्हा मित्रात सांगायचा. सगळेजण उत्सुकतेने ऐकत असायचे.
४ थी संपली आणि आम्ही प्राथमिक शाळेतून ब्राह्मण गावच्या हायस्कूल मध्ये दाखल झालो. सुनील त्यानंतर त्याच्या परिवारासोबत देवळा ह्या शहरात गेला. अनेक वर्ष झाली, पण तो काही भेटला नाही. त्याची आठवण मात्र येत राहिली.
मागच्या ३-४ वर्षापूर्वी त्याचा कॉन्टॅक्ट नंबर मला एका मित्राकडून मिळाला. आणि मी लगेच त्याला फोन केला. हळूहळू बोलता बोलता पूर्वीच्या आठवणीत रममाण झालो.
तो एका बँकेत नोकरीला आहे असे समजले.
काल मी सहज त्याची status बघितली. त्याच्या परिवारासोबत चे फोटो बघत होतो आणि शेवटच्या त्याच्या फोटोखाली लिहिले होते
"Miss you pappa!"
I was shocked.
मी आज सकाळी त्याच नंबर वर फोन केला आणि त्याच्या पत्नीने उत्तर दिलं, "त्यांचे heart attack ने तीन महिन्यांपूर्वीच निधन झाले."
मी फक्त इतकंच विचारलं की त्याला कोविड झालेला होता का. तर कळले की ११ महिन्यांपूर्वी कोवीड झालेला होता.
माझ्या ह्या बालमित्रास भावपूर्ण आदरांजली!
२
आपल्या सर्वच मित्र मैत्रिणींना कळकळीची विनंती: आपल्या आरोग्याला जपा! आपली स्पर्धा ही अधिक श्रीमंती, अधिक संपत्ती, खूप दागिने, खूप फ्लॅट्स, खूप गाड्या, खूप साड्या, प्लॉट आणि अजून काही याच्याशी नसावी!!!
तर आपली स्पर्धा ही आजूबाजूला दिसणाऱ्या म्हाताऱ्यांसोबत असावी. कारण इतकी वर्ष ते तंदुरुस्त पणे जीवन जगत आहेत. त्यांच्या इतके आयुष्य आपल्याला जगता आले पाहिजे.
काहींचे तिशी चाळीशीत डोक्यावरचे पत्रे उडून गेले आहेत आणि समोरच्या म्हाताऱ्याचे अजून डोकेभर काळे केस आहेत. काहींना चष्म्याशिवाय दिसत नाही तर अजूनही काही म्हातारी माणसे चष्म्याशिवाय जीवन जगत आहेत.
आता आपल्याला शिकावे लागेल:
सकाळी लवकर उठून चालायला
थोडेसे पळायला!
आपल्या आहारात बदल करायला
आणि थोडासा योगा करायला!
आठवड्यातून एकदा एखादी टेकडी चढायला
मुलांसोबत सायकल चालवायला!
शिकायला हवे लवकर झोपायला
आणि लवकर उठायला!
ह्या कोवि ड मुळे रक्त घट्ट व्हायला लागलंय
बीपी वाढायला लागला आहे
दम लागायला लागला
हृदयविकाराची ही लक्षणे कमी करायला शिकायला हवे
रोज थोडे चालायला आणि पळायला हवे!!!
धन्यवाद!!
Comments
Post a Comment