Posts

Heart attack

भावपूर्ण श्रद्धांजली!💐💐                            १  सुनील सुभाष सोनवणे इयत्ता १ ली ते ४ थी पर्यंत आम्ही एकाच वर्गात होतो. वर्गातील सर्वात हुशार मुलगा. वाघ गुरुजींच्या वर्गातला! आमची अ तुकडी होती आणि पलीकडची ब. बालपणीचे सर्वच क्षण हे अविस्मणीय असतात आणि मित्र सुध्दा.  सुनील हा अतिशय चुणचुणीत आणि बुध्दीमान. त्याचे अक्षरदेखील खूपच टपोरे आणि सुंदर. गणितात खूपच हुशार. मला चौथीपर्यंत भागाकार काही जमत नव्हता. त्याने पाटीवर भागाकाराची उदाहरणे सहजतेने शिकवली. शिवाय घड्याळ वाचन देखील. त्याचा एक महत्त्वाचा गुण म्हणजे त्याची कथन शैली. त्याने एखादा चित्रपट बघितला तर तो दुसऱ्या दिवशी आम्हा मित्रात सांगायचा. सगळेजण उत्सुकतेने ऐकत असायचे.   ४ थी संपली आणि आम्ही प्राथमिक शाळेतून ब्राह्मण गावच्या हायस्कूल मध्ये दाखल झालो. सुनील त्यानंतर त्याच्या परिवारासोबत देवळा ह्या शहरात गेला. अनेक वर्ष झाली, पण तो काही भेटला नाही. त्याची आठवण मात्र येत राहिली. मागच्या ३-४ वर्षापूर्वी त्याचा कॉन्टॅक्ट नंबर मला एका मित...

महर्षि शिंदे अध्यापक विद्यालय: माझी प्रेरणा

              लहानपणापासून माझे एक स्वप्न होते की आपण शिक्षक व्हावे,ज्ञानदानाचे कार्य करावे. माध्यमिक शिक्षण पूर्ण करीत असताना जेव्हा  घरात कुणी नसायचे, तेव्हा  मी शिक्षकाचा अभिनय करायचो आणि समोर विद्यार्थी बसले आहेत असं समजून त्यांना शिकवायचो. मला सांगण्यास अत्यंत अभिमान वाटतो की  मी बाळगलेले हे  स्वप्न 'महर्षी शिंदे अध्यापक विद्यालय, नाशिक' यामुळे पूर्ण होऊ शकले.               माझा जन्म एका गरीब आणि अशिक्षित कुटुंबात  ब्राह्मणगाव, तालुका- सटाणा येथे झाला. वडिलांचे छत्र लहानपणीच हरपले होते. आई अशिक्षित. परंतु तिने माझ्या मनात 'खूप शीक' अशी भावना निर्माण केली. सतत शिकण्याची प्रेरणा दिली. गावातील प्राथमिक शाळेत दाखल केले. मोलमजुरी करून तिने माझे d.ed पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले.                'ज्ञान हा माणसाचा तिसरा डोळा आहे', हा  सुविचार शाळेत असताना वाचायचो; पण त्याचा अर्थ समजण्याचे ते वय नव्हतं. वर्गात पहिले येण्याची भावना माझ्या मनात इय...