Posts

Showing posts from November, 2021

Heart attack

भावपूर्ण श्रद्धांजली!💐💐                            १  सुनील सुभाष सोनवणे इयत्ता १ ली ते ४ थी पर्यंत आम्ही एकाच वर्गात होतो. वर्गातील सर्वात हुशार मुलगा. वाघ गुरुजींच्या वर्गातला! आमची अ तुकडी होती आणि पलीकडची ब. बालपणीचे सर्वच क्षण हे अविस्मणीय असतात आणि मित्र सुध्दा.  सुनील हा अतिशय चुणचुणीत आणि बुध्दीमान. त्याचे अक्षरदेखील खूपच टपोरे आणि सुंदर. गणितात खूपच हुशार. मला चौथीपर्यंत भागाकार काही जमत नव्हता. त्याने पाटीवर भागाकाराची उदाहरणे सहजतेने शिकवली. शिवाय घड्याळ वाचन देखील. त्याचा एक महत्त्वाचा गुण म्हणजे त्याची कथन शैली. त्याने एखादा चित्रपट बघितला तर तो दुसऱ्या दिवशी आम्हा मित्रात सांगायचा. सगळेजण उत्सुकतेने ऐकत असायचे.   ४ थी संपली आणि आम्ही प्राथमिक शाळेतून ब्राह्मण गावच्या हायस्कूल मध्ये दाखल झालो. सुनील त्यानंतर त्याच्या परिवारासोबत देवळा ह्या शहरात गेला. अनेक वर्ष झाली, पण तो काही भेटला नाही. त्याची आठवण मात्र येत राहिली. मागच्या ३-४ वर्षापूर्वी त्याचा कॉन्टॅक्ट नंबर मला एका मित...